vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसायस्थानिक बातम्या

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ज्याप्रमाणे लंडन म्हणजे युकेची ओळख आहे, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत अशी ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवाने मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असून दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. राज्यात उद्योग, वित्त, शिक्षण, नगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत

देशाच्या शिक्षण क्षेत्रात नवे धोरण राबविले असून परदेशी विद्यापीठांसाठी प्रवेशद्वार खुले केले आहे. त्या अंतर्गत राज्यात नवी मुंबई येथे ‘एज्यु सिटी’ उभारण्यात येत आहे, ज्यामध्ये लंडन विद्यापीठाचा कॅम्पस असणार असून येथे दोन हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ, सी-लिंक आणि ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात आधुनिक शहरी विकास होत आहे. वाढवण बंदर विकसित केले जात असून याठिकाणी बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून हा परिसर ‘चौथी मुंबई’ म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे ईव्ही हब बनत आहे, नागपूर सोलर मॉड्यूल उत्पादन केंद्र बनत आहे, तर पुणे हे उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीत आघाडीवर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर विकासामुळे भारत आज गुंतवणूक स्नेही देश बनला असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनात पारदर्शकता वाढल्याचे नमूद केले. ‘स्ट्रीट व्हेंडर्स’नी डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत. जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत, याचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आहे, २०३० पर्यंत ५० टक्के पुनर्वापर ऊर्जा वापराचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात डेटा सेंटर, एआय आणि क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी पुण्यात विशेष व्यवस्था उभारली जात आहे. स्किल विद्यापीठांमार्फत एचपी सारख्या आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर तज्ज्ञ घडविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फिनटेक आणि फायनान्स कंपन्यांचे माहेरघर म्हणजे मुंबई आहे. ब्रिटन आणि भारतातील भागीदारी आणखी दृढ व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

बांधकाम साईटवरील कामगार सुरक्षा विषयक विशेष जागरुकता शिबीर संपन्न,बांधकाम कामगार सुरक्षेविषयी शिबीर आयोजित करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तर :ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

वटसावित्री पौर्णिमा निमित्त पैठण रोड विटखेडा वार्डात 1001 वडाच्या रोपांचे वाटप. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र अशा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त..

सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा,विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त