vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

सेवा_संकल्प_अभियानश्री क्षेत्र यवतेश्वर परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

#सेवा_संकल्प_अभियानश्री क्षेत्र यवतेश्वर परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

सातारा द प्रतिनिधी :- स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र यवतेश्वर ता. सातारा येथील तीर्थक्षेत्र परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात असून या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

या मोहिमेदरम्यान यवतेश्वर मंदिर परिसर व कास-यवतेश्वर रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील कचरा संकलित करण्यात आला. जमा करण्यात आलेल्या नारळाच्या करवंट्या व इतर सेंद्रिय कचरा कंपोस्टिंगसाठी पाठवण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, कमांडो अकॅडमीचे दया शितोळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या जिल्हा तज्ञ रवींद्र सोनवणे, अजय राऊत, राजेश भोसले, ऋषिकेश शीलवंत, राजेश इंगळे, नीलिमा सनमुख, ब्रह्मेंद्र जंगम, अमित गायकवाड, हेमा बडदे, प्रियंका देशमुख, संजय पवार यांच्यासह यवतेश्वरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने म्हणाल्या, स्वच्छता ही सेवा यासारखे उपक्रम नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतात. स्वच्छता हा केवळ एक उपक्रम न राहता तो आपल्या संस्कारांचा भाग झाला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घराची व परिसराची स्वच्छता राखल्यास गाव आपोआप स्वच्छ होईल. तसेच कुटुंब पातळीवर ओला, सुका आणि घातक कचरा अशा चार प्रकारांत कचऱ्याचे वर्गीकरण करून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मोहिमेच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी स्वच्छता शपथ घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय जनसंपर्कासाठी निघालेल्या भारतीय नौदलाच्या कार रॅलीला नौदल प्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026-उमेदवारांच्या निवडीसाठी स्किल कॉम्पीटीशनØ तरुणांना कौशल्य स्पर्धेकरिता संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta