vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

 सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्हास्तरीय विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता ठरला. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजातून विरंगुळा मिळावा या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश व्यक्त करताना म्हणाले, ही स्पर्धा होती, संघर्ष नव्हता, खेळाचा आनंद घेणारा खरा खेळाडू असतो. यावर्षी 29 ऑगस्टला ही स्पर्धा सुरू केली. दरवर्षी 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी या स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

  विविध विभागांच्या 16 संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आली होती. शनिवार व रविवार अशा सुट्टीच्या दिवशी या स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने पार पडले. उपांत्य फेरीत पोलीस विभाग, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, वैद्यकीय महाविद्यालय मिरज व कृषी विभाग या संघाने प्रवेश केला होता. अंतिम सामना पोलीस विभाग व महावितरण यांच्यात झाला

  प्रथम फलंदाजी करत 5 षटकात महावितरणने 55 धावांचा टप्पा पार केला. प्रतिउत्तरादाखल पोलीस संघाने 3 षटके 1 चेंडूत 58 धावा काढून 11 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकून प्रथम क्रमांकाच्या प्रशासन चषकावर आपले नाव कोरले. महावितरण संघास द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.

  ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत आणि क्रीडा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !*_*देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश !*

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण,हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर माफी मागा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..

जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू