vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

                सांगली, प्रतिनिधी) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या भटक्या जमाती क धनगर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2 लाक्ष 50 हजार रूपये पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 38 हजार रूपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

या योजनेतंर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरिता तसेच थेट द्वितिय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज दि. २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांच्या कार्यालयात दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करणे बंधनकारक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा सभा,  बीडचे आमदार सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा काय म्हणाले ते पहा

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात..

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेसोमवारी (दि.३०) रोजगार मेळावा

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम-  आज उद्घाटन होणार

vishwatmaklokswamivarta