vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी

जालना । प्रतिनिधी – जालना नगर परिषदेची शहर महानगर पालिका झाली आहे. जालना शहरात कुठेही स्वच्छता विषयी कामे झाली नसून यास भ्रष्टाचारी स्वच्छता प्रमुख व स्वच्छता निरीक्षक जबाबदार असून जालना मनपातून बदली होऊन गेलेले पंडीत पवार, अशोक लोंढे, विलास गावंडे यांना पुन्हा जालना शहर महानगर पालिकेत घेऊ नये अशी मागणी विद्रोही पँथर गरीबांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस. प्रेमभाई जाधव यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांकडे जालना जिल्हाधिकार्‍यांमार्फत केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना नगर परिषदेवरून महानगरपालिका झाली असून यामध्ये जालना शहराचा कुठलाच स्वच्छता विषयी विकास झाला नसून याला कारणीभूत भ्रष्टाचारी स्वच्छता प्रमुख व स्वच्छता निरीक्षक पंडित सखाराम पवार व अशोक किशनराव लोंढे स्वच्छता, विलास उत्तमराव गावंडे निरीक्षक श्रेणी – क हे तीन जण गेल्या 15 ते 20 वर्षापासून जालना नगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षकाचे काम बघत आहे. यांनी यांच्या कामामध्ये लाखो-करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून स्वच्छतेकडे लक्ष न देता हे स्वच्छता निरीक्षक शहरातील अनाधिकृत बांधकामाकडे लक्ष देवून त्या बांधकाम धारकांकडून त्यांनी लाखो रुपये उकळले असल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

जालना येथील स्वच्छते विषयी यांनी कुठलिच स्वच्छता केली नसून संपूर्ण जालना शहर हे घाणीचे साम्राज्य झाले आहे. अशा भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना महानगर पालिकेमध्ये घेण्यात येवू नये. त्यांना जालना महापालिकेत पुन्हा रूजू केल्यास विद्रोही पँथर गरीबांची संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासह उपोषण करण्यात करण्याचा ईशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस. प्रेमभाई जाधव यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

vishwatmaklokswamivarta

कल्पना बोर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामात ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta