vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

जालना,(प्रतिनिधी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अभ्यासू नेतृत्व व प्रखर वक्ते अ‍ॅड नाझेर काझी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री काझी यांची नुकतीच प्रदेश राष्ट्रवादी काँगे्रस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अल्पावधीत काळात मराठवाडा व खानदेश विभागाचा झंझावत पक्षीय दौरे करुन संघटनेत नवचैतन्य निर्माण करुन पक्षाला दिशा देवून धर्मनिरपेक्षतेची बीजे रोवली श्री काझी यांच्या या प्रशंसनीय कार्याची राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यांनी दखल घेवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.

सदरील नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी जारी केले आहे. स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर यांचे जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान, शिवराज जाधव,इम्रान बिल्डर, जहीर बिल्डर, शेख शोएब, शेख मुजम्मील, सय्यद जावेद अली, इलियास मुसा, शेख उमेर, सय्यद आरेफ, आरेफ बागवान, गफ्फार बेग यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा – खासदार नारायण राणे

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र..

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव ‘सेतू सुविधा’ केंद्रांच्या माध्यमातून सुलभ प्रशासनासाठी सन्मान; ‘सेवा हक्क दिनी’ मुख्य सचिवांच्या हस्ते गौरव

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा