vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: एक विद्यार्थी- एक वृक्ष हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार असून सामाजिक वनीकरण व वन विभागाकडून पहिली ते बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व विभागांनी योग्य प्रकारे नियोजन करुन सक्रीय सहभाग नोंदवून पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

सद्यस्थितीत आपण सर्वजण ऋतुचक्र बदलाचा अनुभव घेत आहोत. अवकाळी पाऊस, तीव्र स्वरुपाचा उकाडा, उष्णलहरी, तसेच सागरी प्रवाहाचा दुष्परिणाम म्हणून कमी पावसाचा धोका या पर्यावरण विषयक बाबींमुळे अनेक समस्या आपणासमोर उभ्या राहिल्या आहेत. वृक्ष लागवडीबाबत शासन यंत्रणेकडुन अनेक प्रयत्न केले जातात. दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. परंतू या सर्व प्रयत्नांना नागरीकांचा म्हणावा तसा सहभाग मिळत नाही. सामाजिक दायित्व म्हणूनही प्रत्येकाने वृक्ष लागवड उपक्रमात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.       महाराष्ट्रात हरित अच्छादन वाढविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2025 च्या पावसाळ्यासाठी एकूण 10 कोटी वृक्षलागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देशानुसार एक पेड माँ के नाम ही संकल्पना राबविण्यात येत आहे.       भारत वृक्ष क्रांती मिशनचे समाजसेवक तथा संस्थापक ए.एस.नाथन यांच्या संदर्भीय पत्रानुसार एक विद्यार्थी- एक वृक्ष हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये राबविण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण व वन विभाग यांनी सर्व पहिली ते बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत रोपे उपलब्ध करुन द्यावीत. हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व विभागांनी योग्य प्रकारे नियोजन करुन सक्रीय सहभाग नोंदवून पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी दिले आहेत.

उपक्रमाबाबत ठळक बाबी1.उपक्रम दरवर्षी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये राबवावयाचा असल्याने प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावणे आवश्यक आहे.2. उपक्रमाबाबतचे पत्राची प्रत प्रत्येक शिक्षकास/ प्राध्यापकास देण्यात यावी. तसेच एक प्रत प्रत्येक शाळेच्या / महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावावी.3. सदर उपक्रमाबाबत शाळेतील/ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक/ वर्गशिक्षकांनी प्रोत्साहीत (Motivational) करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे व सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लावले किंवा कसे? याबाबतची माहिती घेण्याची जबाबदारी वर्ग शिक्षकाकडे असणे अनिवार्य आहे.4. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात रोपे हे फक्त शाळा तसेच महाविद्यालयातच लावावे याची सक्ती करु नये. विद्यार्थ्यास त्याच्या सोईच्या ठिकाणी, जेथे तो वृक्षाचे चांगल्या प्रकारे संगोपन करेल अशा ठिकाणी लावता येईल.5. विद्यार्थ्याने लावलेल्या झाडास त्या विद्यार्थ्याचे नाव देणे तसेच त्याचा वाढदिवस झाडासोबत साजरा करण्याबाबत प्रेरणा द्यावी

6. कोणतेही झाड लावण्यासाठी शासनाच्या यंत्रणेमार्फत/ प्रायोजकामार्फत/ स्वत: विकत घेवून किंवा बिजाद्वारे तयार करुन प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष लावणेबाबत सुचित कराव7. विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षाबाबत दर महिन्याला त्या वृक्षाची स्थिती जाणून घ्यावी. एखादे वृक्ष काही कारणाने सुकल्यास त्या वृक्षाऐवजी दुसरे नविन रोप लावण्याबाबत त्यांचे प्रबोधन करावे.

8. जे विद्यार्थी वृक्ष लावतील व त्या वृक्षाचे चांगल्या प्रकारे संगोपन करतील, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात गुणपत्रिकेत काही गुणांचा समावेश करावा.

9. उपरोक्त उपक्रमास शिक्षक तसेच प्राध्यापकांनी त्यांचे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्ष लावल्याबाबतचा अहवाल सादर करावा. सदर अहवालामध्ये शाळेचे नाव, शिक्षक/ प्राध्यापकाचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, वृक्षाचे नाव याचा समावेश असावा. तसेच विद्यार्थ्यांना शक्य असल्यास त्यांनी लावलेल्या वृक्षासोबत त्यांचे छायाचित्र घ्यावे.

एक विद्यार्थी- एक वृक्ष या उपक्रमासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या विद्यार्थ्यांना शाळात तसेच महाविद्यालय स्तरावर सत्कार करावेत.11. एक विद्यार्थी- एक वृक्ष या उपक्रमासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षक/ प्राध्यापकांची निवड करुन त्यांना सन्मानित करण्यात यावे.12. एक विद्यार्थी- एक वृक्ष या उपक्रमासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या शाळा/ महाविद्यालयाची निवड करुन त्यांना सन्मानित करण्यात यावे.

*****

संबंधित पोस्ट

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता यंत्रणांनी अधिक अलर्ट राहावे ‘जिल्हाधिकारी किशन जावळे

राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले.

जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्त संस्थांकडून ऑडिट

vishwatmaklokswamivarta

सरपंच ग्रामविकासाचे दूत – रोहयो मंत्री भरत गोगावले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta