vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

न्यू एरा हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

न्यू एरा हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, प्रतिनिधी : रामदासपेठ येथील न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी झाले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पगारिया समूह आणि प्रेमजी इन्व्हेस्ट यांच्या पाठबळावर उभारलेली ही आरोग्यसंस्था आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि रुग्णांविषयी करुणाभाव या तत्त्वांवर आधारित न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच छताखाली सर्वसमावेशक, रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात आले असून, प्रगत निदान सेवा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा, अवयव प्रत्यारोपण, न्यूरोसायन्सेस, माता व बाल आरोग्य सेवा, रोबोटिक शस्त्रक्रिया तसेच विविध सुपर स्पेशालिटी सेवा येथे उपलब्ध असतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील आरोग्य सुविधांची पाहणी करून रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रुग्णालयाच्या माध्यमातून प्रदेशातील दर्जेदार आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या उद्घाटन सोहळ्याला नामवंत डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील नामवंत, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यसेवा, वैद्यकीय नवोपक्रम आणि संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर वैद्यकीय तज्ज्ञ आणि धोरणात्मक भागीदारांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. यामध्ये पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. आनंद भुतडा, डॉ. अतिश बाकणे, डॉ. अलंकार रामटेके यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फूट प्रिंट ऑफ डिग्निटी’ पुस्तकाचे प्रकाशन

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

गोवा बनावटीची अवैध दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..