vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा

  अहिल्यानगर, प्रतिनिधी: शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या ठिकाणांच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे

  शासनाच्या ग्रामविकास विभागाने ५ मार्च २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार कर्जत तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, शेगुड, श्री लालगिर बुवा मठ ट्रस्ट, मांदळी, तसेच श्री क्षेत्र जगदंबा मंदिर देवस्थान, कुलधरण आणि जामखेड तालुक्यातील श्री जवळेश्वर देवस्थान, जवळा या यात्रास्थळांना ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत ‘ब’वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे.

  या दर्जामुळे संबंधित यात्रास्थळांच्या परिसरात मूलभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुशोभीकरण यासह इतर विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

  प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावर महत्त्वाचा निर्णय झाला असून स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे

00000

संबंधित पोस्ट

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत…

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्तआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश..

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

vishwatmaklokswamivarta