vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत…

“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत…

नांदेड प्रतिनिधी :- “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र प्रशिक्षण भागीदार (Training Partner TP/Training Center TC) संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आली आहेत. इच्छुक व पात्र प्रशिक्षण भागीदार, प्रशिक्षण केंद्र (TP/TC) संस्थांनी आपले प्रस्ताव शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे दोन प्रतित सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत ग्रामीण युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, भोकर तालुक्यातील वाकद, बिलोली तालुक्यात कासराळी, धर्माबाद तालुक्यात येताळा, हदगाव तालुक्यात तामसा, नांदेड जिल्ह्यात धनेगाव, किनवट तालुक्यात गोकुंदा, उमरी तालुक्यात शिंधी (स्थलांतरित वाडी) या 8 ठिकाणी ही केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रत्येक ठिकाणी एक केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे.

प्रस्ताव सादर करणारी संस्था ही भागीदारी संस्था, एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, ट्रस्ट किंवा सोसायटी म्हणून विधिवत नोंदणीकृत, मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदार, प्रशिक्षण केंद्र (TP /TC) असणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेकडे कौशल्य विकास क्षेत्रातील अनुभव, प्रशिक्षण दिल्याचा पुरावा, तसेच उद्योग संलग्नता (Placement/Industry Linkage) असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेची नोंदणी Skill India Digital Portal वर असणे बंधनकारक आहे.

प्रस्ताव सादर करताना मागील 4 वर्षांचा केवळ कौशल्य विकास प्रशिक्षणातील आर्थिक उलाढाल, आवश्यक पायाभूत सुविधा, तसेच संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीद्वारे करण्यात येऊन पात्र संस्थांची निवड करण्यात येणार आहे. या विषयीची तपशीलवार माहिती जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. संदर्भाकरिता तिचे अवलोकन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये ‘नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ उपकंपनी स्थापन करणार

रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

आप खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दोन तृतीयांश खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात विलीन …

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात १७४ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती !शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुकंपा धोरणातील बदलामुळे नियुक्ती प्रक्रिया गतिमान