vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन

नांदेड, प्रतिनिधी:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” (CRT) बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माहे एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार 1,8,15 एप्रिल रोजी डिजीटल शेतीशाळा संपन्न झाल्या असून चौथी विशेष डिजीटल शेतीशाळा 22 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.यापूर्वी दिनांक १, ८ व १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग ४ भात शेतीचे लागवड तंत्र : भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणी साठी यांत्रिकी पद्धत बाबत नियोजित दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे.  तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. चला, हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवूया.   उपरोक्त शेती शाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता-

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH

या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा तसेच प्रत्येक गावातील जास्तीत जास्त शेतक-यांनी विशेषत: बिलोली, देगलूर, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील गावांमधील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

vishwatmaklokswamivarta

सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी व निरोगी जीवनशैलीच्या प्रसारावर भर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर,विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ 

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

vishwatmaklokswamivarta

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार