vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- आगामी २०२६ च्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांकडे ‘मतदार ओळखपत्र’ सोबत असणे आवश्यक आहे. मात्र, ऐनवेळी मतदानाच्या दिवशी एखाद्या मतदाराकडे ओळखपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत विनाअडथळा सहभागी होता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १२ पर्यायी कागदपत्रांना पुरावा म्हणून मंजुरी दिली असून, यापैकी कोणताही एक दस्तऐवज दाखवून नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात,‌ असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मतदानासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या या १२ पर्यायी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), भारतीय पासपोर्ट आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक यांचा समावेश आहे. याशिवाय मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड किंवा ‘आयुष्मान भारत’ कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत मिळालेले स्मार्ट कार्ड, तसेच फोटो असलेली पेन्शनची कागदपत्रेही चालतील. यासोबतच केंद्र किंवा राज्य सरकार आणि सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, खासदार-आमदारांचे अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेले दिव्यांगत्वाचे ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदान करता येईल.

मतदान करताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आयोगाने काही विशेष सवलती आणि नियमही स्पष्ट केले आहेत. मतदार ओळखपत्रावरील नावात स्पेलिंग मिस्टेक किंवा किरकोळ कारकुनी चुका असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून मतदान करू दिले जाईल; तसेच तुमचे ओळखपत्र दुसऱ्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांनी दिलेले असले, तरी तुमचे नाव राहुरीच्या मतदार यादीत असल्यास ते ग्राह्य धरले जाईल. मात्र, ओळखपत्रावरील फोटोवरून तुमची ओळख पटत नसेल, तर वरील १२ पैकी एखादा पर्यायी पुरावा दाखवणे सक्तीचे असेल. याव्यतिरिक्त, ज्या मतदारांनी भारतीय पासपोर्टच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदवले आहे, त्यांना मतदान केंद्रावर केवळ त्यांचा मूळ पासपोर्टच दाखवणे बंधनकारक असून त्यांना इतर कोणताही पुरावा वापरता येणार नाही.

000000

संबंधित पोस्ट

♦️आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठुरायाचं २४ तास दर्शन सुरु.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान*

vishwatmaklokswamivarta