vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा 

जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

​अहिल्यानगर, प्रतिनिधी :- जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यासाठी शासनाने ३१ लाख ९६ हजार ५ रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न एकाच ठिकाणी सुटणार आहे.

शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. नवीन शेतकरी भवन बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून १ कोटी २७ लाख ८४ हजार १७ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. या मंजूर रकमेच्या ५० टक्के प्रमाणे ६३ लाख ९२ हजार ९ रुपये इतके शासन अनुदान या बांधकामासाठी अनुज्ञेय ठरले आहे. या अनुज्ञेय अनुदानाच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच ३१ लाख ९६ हजार ५ रुपये पहिला टप्पा म्हणून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा उपलब्ध झालेला निधी वितरीत करण्यासाठी पुणे येथील राज्याच्या पणन संचालकांना मान्यता देण्यात आली आहे.

​मंजूर करण्यात आलेला पहिल्या टप्प्यातील हा निधी जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधार संलग्नित बँक खात्यावर पणन संचालनालयामार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भवनाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता गती मिळणार आहे. राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही, तेथे नवीन भवन बांधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जामखेडमधील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून परिसरातील हजारो शेतकरी बांधवांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

निवडणूक प्रचारावरील निर्बंधात बदल-मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० पासून प्रचारबंदी लागू

vishwatmaklokswamivarta

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचा ६३ वा औषध सोहळा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न 

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद