vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना (सन २०२५-२६) राबविण्यात येत आहे.

सन २०२५-२६ मधील गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज भरण्यापूर्वी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी रु. १०,००० तर मुलाखतीच्या तयारीसाठी रु. ५,००० इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे. योजनेविषयीची सर्व माहिती अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२६ असा आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन अमृतचे व्यवपकीय संचालक यांनी केले आहे

000000

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची  

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

vishwatmaklokswamivarta