vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

*महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

गडचिरोली, प्रतिनिधी-केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सन २०१७ पासून नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षण तसेच सन २०१९ पासून सुरू असलेल्या असंघटित क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन्ही महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे.

आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर यांसारख्या विविध श्रमसंबंधित निर्देशांकांचे त्रैमासिक व वार्षिक अंदाज प्राप्त होतात. या सर्वेक्षणातून कामगारांचे उद्योगनिहाय वितरण, रोजगाराची सद्यस्थिती, उत्पन्न, कामाचे तास तसेच वयोगट, लिंग, शैक्षणिक स्तर आणि ग्रामीण-शहरी भागानुसार श्रमबाजारातील स्थितीचे सविस्तर चित्र समोर येणार आहे. यावर आधारित वार्षिक अहवाल प्रकाशित केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या असंघटित क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी राबविले जाते. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनातही त्याचे लक्षणीय योगदान आहे. उत्पादन, व्यापार तसेच व्यापाराव्यतिरिक्त निवडक सेवा या तीन प्रमुख घटकांतील बिगर-कृषी असंघटित आस्थापनांचा या सर्वेक्षणात समावेश राहणार आहे. या माध्यमातून उत्पन्न, रोजगारनिर्मिती आणि क्षेत्रातील वाढीच्या शक्यता यांचा सखोल अभ्यास होणार आहे.

सदर सर्वेक्षणांद्वारे शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांकडून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे देश, राज्य व जिल्हा स्तरावर नियोजन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील धोरणनिर्मिती आणि शाश्वत विकास ध्येयांच्या निर्देशांकांसाठीही ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या अनुषंगाने एप्रिल २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून गाव व शहरांमध्ये भेटी देऊन विहित नमुन्यात माहिती संकलित केली जाणार आहे.

कुटुंबांकडून देण्यात येणारी अचूक माहिती ही या सर्वेक्षणांच्या यशस्वितेसाठी अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

विशेष – दुष्काळाकडून जल समृद्धीकडे किरकसाल गावची वाटचाल…

vishwatmaklokswamivarta

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन-सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून,बोले सो निहाल’च्या जयघोषाने दुमदुमले खारघर…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा