vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी: राहुरी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या टपाली मतदानासाठी मान्य मतदारांसाठी १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी गृह मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास १९ एप्रिल हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. ही प्रक्रिया सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप यादव यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढवण्यासाठी व शारीरिक अडचणींमुळे मतदान केंद्रावर येणे शक्य नसलेल्या मतदारांना सुलभता निर्माण करून देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी १२-डी अर्ज भरून या सुविधेची मागणी केली आहे, त्यांनाच गृह मतदानाची सुविधा लागू राहणार आहे.

या प्रक्रियेसाठी नियुक्त प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी व एक व्हिडिओग्राफर यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गोपनीय पद्धतीने पार पाडली जाणार असून, नमुना १० भरून उमेदवारांनी नियुक्त केलेले मतदान प्रतिनिधीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विहित नोंदवहीतील पात्र मतदारांनी १७ व १८ एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानी उपस्थित राहून मतदान प्रक्रियेस सहकार्य करावे. पहिल्या भेटीत मतदार घरी उपलब्ध नसल्यास पथक दुसऱ्यांदा भेट देईल, मात्र त्यानंतर मतदानाची संधी उपलब्ध होणार नाही,‌असे आवाहनही श्री.यादव यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

सहकार पुरस्कार; सहकारी संस्थांकडून 18 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गावागावात शाखा स्थापन करणार – सचिन आडे पाटील