vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

 

राज्य प्रतिनिधी: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढग फुटी भीषण पूरस्थिती अनेक अनेक मृत्युमुखी तर अनेकांचा शोध सुरू घटनास्थळी प्रशासन तत्परतेने काम चालूच

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta