vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर.

 

राज्य प्रतिनिधी-राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान!
सिल्लोडमध्ये केळणा नदीच्या पुरामुळे २ सामाईक बस अडकल्या; सोयगावमध्ये सर्व्हिस पूल वाहून गेला, तर कन्नडमध्ये पूर्णा नदीला महापूर! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा!

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली. सध्या धरणाचे ४१ पैकी ४ गेट पूर्णपणे उघडण्यात आले असून ३२ गेट २ मीटरने उघडले आहेत. तापी नदीपात्रात सध्या १,८५,८२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे.त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद!बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मलकापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे

“यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! १ हजार ३९६ हेक्टर पिकांचे नुकसान तर ८२ घरांची पडझड; पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४० नागरिकांना प्रशासनाने दिले जीवदान, बळीराजाकडून तातडीच्या मदतीची मागणी!

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. पावसाचा जोर ओसरल्याने बहुतांश राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पुन्हा सुरू झाली असून काही मार्ग वगळता जनजीवन सुरळीत होत आहे.गडचिरोली शहरातील सखल भागात साचलेलं पाणी काढण्यासाठी नगर परिषदेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सीबीच्या सहाय्याने नाले आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू नये, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू.

 

संबंधित पोस्ट

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026-मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रंगीत तालीम..

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

💧 मुंबईसाठी दिलासादायक बातमी! वैतरणा धरण ९५% भरले, आणि हजारो क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात* *- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*