vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गावागावात शाखा स्थापन करणार – सचिन आडे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गावागावात शाखा स्थापन करणार – सचिन आडे पाटील

जालना /प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मराठवाड्यातील प्रत्येक गावात पार्टीची शाखा स्थापन करून, राष्ट्रीय अध्यक्ष आजितदादा पवार यांची ताकद वाढविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन आडे पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी सचिन आडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे ,पार्थ अजित पवार यांच्या सूचनेनुसार युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सचिन आडे पाटील यांना नियुक्तीपत्र देवून नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर नुतन रायुकाँचे प्रदेश सचिव सचिन आडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागळात मजबुत करण्यासाठी मराठवाड्यात युवकांची फौज उभारणार असल्याचे सांगत गाव तिथे रायुकॉ पक्षाची स्थापना करणार असल्याचे सांगितले. आगामी महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युवकांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे प्रयत्न करणार असल्याचे सचिन आडे पाटील यांनी सांगितले.

 यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य प्रवक्ते आनंद परांंजपे, प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे, आ. राजेश विटेकर, आ. सुनील टिंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रीय सचिव परबजितसिंग सैनी, प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, प्रदेश सरचिटणीस रणजित नारुटे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस कय्युम खान,रशीद बागवान, गणेश भुतेकर, राहुल लशकर, लखनकुमार, आकाश शिंदे आदिंची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी दिली ऑनलाईन परीक्षा* 

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ !राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

🏵️ लिव इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही : अशा जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय!*

vishwatmaklokswamivarta