vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वक्फ बचाव’ परिषद जालन्यात २८ जून रोजीप्रमुख इस्लामी विद्वान व नेते वक्फ कायद्यातील सुधारणांवर भाष्य करणार…

वक्फ बचाव’ परिषद जालन्यात २८ जून रोजीप्रमुख इस्लामी विद्वान व नेते वक्फ कायद्यातील सुधारणांवर भाष्य करणार…

 

जालना : प्रतिनिधी-अलीकडेच लागू झालेल्या वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधात जनजागृती करणे आणि जनमत तयार करण्याच्या उद्देशाने, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या तहफ्फुज-ए-अवकाफ समितीच्या (वक्फ बचाव समिती) वतीने ‘वक्फ बचाव’ ही महत्त्वपूर्ण परिषद शनिवार, २८ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता ते रात्री १० वाजेपर्यंत जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.

आयोजकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या परिषदेचे उद्दिष्ट सुधारित वक्फ कायद्याचे संभाव्य परिणाम स्पष्ट करणे तसेच देशभरातील वक्फ मालमत्तेच्या संरक्षणासाठी सामूहिक कृतीची रणनीती आखणे हे आहे.

या परिषदेला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तसेच विविध प्रमुख इस्लामिक संघटनांचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रमुख वक्त्यांमध्ये मौलाना फजलूर रहीम मुजद्दी (सरचिटणीस, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड), मौलाना उमरैन महफूज रहमानी (सचिव, बोर्ड), मौलाना सय्यद सदतुल्ला हुसैनी, डॉ. सय्यद कासिम रसूल, मौलाना असगर अली मेहदी, मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी (अध्यक्ष, जमियत उलेमा महमूद मदनी – महाराष्ट्र), मौलाना हलीमुल्ला कासमी आणि महमूद दर्याबादी यांचा समावेश आहे.

या परिषदेस यशस्वी करण्यासाठी मुफ्ती अब्दुल रहमान, मौलाना अब्दुल रौफ नदवी (संयोजक, तहफ्फुज-ए-अवकाफ कमिटी), मौलाना सय्यद नसरुल्लाह हुसैनी सुहेल नदवी, ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, मुफ्ती फहीम, शेख मुजीब (सचिव, जमाअते इस्लामी हिंद – महाराष्ट्र), लियाकत अली, फेरोज अली, इलियास नादवी, असदुल्ला रझवी, सय्यद इरफान, अतिक खान, मोहम्मद कासिम, अब्दुल वाहिद, अहमद नूर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्तकालीन यंत्रणा मदतीसाठी सज्ज,काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ला 500 कोटी निधी देण्याचा राज्य सरकार चा निर्णय स्वागतार्ह ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके*आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिवांनी घेतला आवास योजनाचा आढावा,आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या – एकनाथ डवले