vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकार पुरस्कार; सहकारी संस्थांकडून 18 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

सहकार पुरस्कार; सहकारी संस्थांकडून 18 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

बुलडाणा, प्रतिनिधी: राज्यातील सहकार चळवळीला बळकटी देणाऱ्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना महाराष्ट्र शासनामार्फत “सहकार पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील कामगिरीच्या आधारे या पुरस्कारासाठी पात्र संस्थांची निवड केली जाणार आहे. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला आहे.पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती सहकार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://sahakarayukta.maharashtra.gov.in तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका स्तरावरील सर्व सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी केलेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह 18 जुलै 2025 पर्यंत संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावेत. सहकारी क्षेत्रातील पारदर्शक व प्रेरणादायी कार्यास शासन पुरस्कृत स्वरूपात प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली पिढी समाजासाठी मोठे संकट : मंगल खिवंसरा

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना,सुमारे 8000 कोटींची गुंतवणूक होणार, 2000 रोजगार निर्मिती…