vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

राज्य प्रतिनिधी –

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या दरम्यान राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले. त्यामध्ये १४,०६६ मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातात १४,१८५ मृत्यू झाले होते. तुलनात्मकदृष्ट्या पाहता, अपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या ११९ ने म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटली आहे. मृत्युदरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे यश दाखवते.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ८२ अपघाती मृत्यू झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ६१ वर आली आहे. तसेच अपघातांची संख्या ६६ वरून ५४ इतकी कमी झाली आहे.

रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे. नागपूर शहरात २१ टक्के, पालघरमध्ये २० टक्के, अमरावतीत १७ टक्के, पुण्यात १५ टक्के, धुळ्यात १४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत.

राज्यातील रस्ता अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट #परिवहन विभागाने निश्चित केले असून, त्यासाठी भविष्यात रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व वाहनचालक व पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

#रस्तेसुरक्षा

संबंधित पोस्ट

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 अंतर्गत प्राप्त निधी वेळेत खर्च करावा: पालकमंत्री पंकजा मुंडे· जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 करीता 514.96 कोटींचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्व विभागात १ऑगस्टपासून बायोममॅट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू

महाराष्ट्र राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार केलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन…

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta