vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद- 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’उपक्रमØ आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद- 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’उपक्रमØ आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

Ø महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत नागरिकांशी संवाद..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा ‘संवाद मराठवाडयाशी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ येत्या 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

 विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या उपक्रमाची सुरूवात झाली आणि संपूर्ण प्रशासन थेट गावात पोचले. या उपक्रमाच्या यशानंतर विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत विभागीय आयुक्त श्री गावडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत संवाद साधणार आहेत. श्री. गावडे यांच्यासमवेत यावेळी विभागीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असणार आहेत. प्रत्येक आठवडयात दर बुधवारी 4 ते 6 यावेळेत आयुक्त नागरिकांशी संवाद साधतील. प्रत्येक संवादावेळी प्रशासकीय विभाग व विषय ठरविण्यात येणार असून यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित विषयावर विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

नागरिकांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधता येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले आहे.

याबाबतचा क्युआर कोडही प्रसिदध करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

संबंधित पोस्ट

बेपत्ता व्यक्ती आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘रेड्स’ AI ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा१२० रुग्णवाहिकेद्वारे, ८६४३ वारकऱ्यांची आरोग्यसेवा..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर त्याचे मुद्दे सादर…

vishwatmaklokswamivarta

हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले