vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्याची मागणी सय्यद अशफाक अली यांनी कामगार सहाय्यक उपआयुक्त विभागीय कार्यालय मालजीपुरा रेल्वे स्टेशन यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर माथाडी बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप केले जातात. परंतु आपल्या कार्यालयामार्फत सदरील साहित्याचे वाटप मागील सहा महिन्यापासुन बंद आहे. तसेच अनेक माथाडी कामगारांचे नुतनीकरण देखील संपले आहे. आपल्या कार्यालयाच्या उदासिन धोरणामुळे अनेक माथाडी कामगार या योजनेपासून वंचित आहेत.

तरी लवकरात लवकर नोंदणीकृत मायाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात यावे. नसता आपल्या कार्यालयासमारे माथाडी कामगार प्रदेश प्रमुख मा. छगन पाटील व माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष हमद चाऊस तसेच माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माथाडी कामगार प्रदेश सरचिटणीस सादीक इनामदार यांच्या निदर्शनाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा सरचिटणीस माथाडी कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सय्यद अशफाक अली व शेख अर्सलान यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे व २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे तर, २१ वर्षे मुदतीचे ५३० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक .

vishwatmaklokswamivarta

650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पुणे महामेट्रो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद

vishwatmaklokswamivarta