vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने…

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 माहिने ऐवजी 11 माहिने करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डीबीटीव्दारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी दि. 10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र) तपासणी करणे आवश्यक आहे.

योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे.

आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक अकाऊंटला आधार लिंक आहे. तोच बँक खाते क्रमांक योजनेच्या विद्यावेतन डीबीटी साठी नमुद करणे आवश्यक आहे.

 प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी तसेच आस्थापना यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्याशी संपर्क करावा किंवा 8012971111 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी केले आहे.

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्याची मागणी सय्यद अशफाक अली यांनी कामगार सहाय्यक उपआयुक्त विभागीय कार्यालय मालजीपुरा रेल्वे स्टेशन यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर माथाडी बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप केले जातात. परंतु आपल्या कार्यालयामार्फत सदरील साहित्याचे वाटप मागील सहा महिन्यापासुन बंद आहे. तसेच अनेक माथाडी कामगारांचे नुतनीकरण देखील संपले आहे. आपल्या कार्यालयाच्या उदासिन धोरणामुळे अनेक माथाडी कामगार या योजनेपासून वंचित आहेत.

तरी लवकरात लवकर नोंदणीकृत मायाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात यावे. नसता आपल्या कार्यालयासमारे माथाडी कामगार प्रदेश प्रमुख मा. छगन पाटील व माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष हमद चाऊस तसेच माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माथाडी कामगार प्रदेश सरचिटणीस सादीक इनामदार यांच्या निदर्शनाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा सरचिटणीस माथाडी कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सय्यद अशफाक अली व शेख अर्सलान यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- महा-TET परीक्षा २०२५ सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta