vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- महा-TET परीक्षा २०२५ सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- महा-TET परीक्षा २०२५ सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

 सांगली, द प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) 2025 च्या सुरळीत आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक जबाबदारी घ्यावी. परीक्षा कामकाजात कोणतीही दिरंगाई होऊ नये, नियोजनात्मक अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. ही परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडावी. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विद्यार्थी, पालकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) 2025 च्या संचालनाबाबत जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस डाएट प्राचार्य विकास सलगर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी नागेश ठोंबरे, जोतिराम पाटील, प्रकाश खेडकर, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच सर्व केंद्र संचालक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, परीक्षा कालावधीत गोपनियता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. केंद्रावर सी.सी.टी.व्ही., सुरक्षा रक्षक आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायफाय सिंग्नल, जॅमर इत्यादी उपकरणांना मनाई असेल. परीक्षा केंद्रावर सर्व भौतिक सुविधा, मनुष्यबळाची नियुक्ती, स्वच्छतागृह इत्यादी अद्ययावत असावे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सोयीस्कर व्यवस्था असावी. केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित ठेवावेत. परीक्षा झाल्यानंतर परीक्षा साहित्य जिल्हास्तरावर काळजीपूर्वक जमा करावे, असा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

 सांगली जिल्ह्यामध्ये महा-TET २०२५ परीक्षेसाठी पेपर-१ साठी 5087 विद्यार्थी प्रविष्ट, पेपर-२ साठी 7199 विद्यार्थी प्रविष्ट या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 7560 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून त्यानुसार 27 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी तळमजल्यावर स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणेचा वॉच असणार आहे.

 शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड म्हणाले, महा-TET परीक्षा २०२५ चे संपूर्ण कामकाज व्हिडिओ रेकॉर्डिंग व सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पादरर्शकपणे पार पाडण्यात येणार असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना, परीक्षार्थी व पालकांना केले.परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधा, केंद्र संचालक व सहाय्यक परीक्षक नियुक्ती, सुरक्षा व्यवस्था व पूर्वतयारी याबाबत सादर केलेल्या अहवालांचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी घेतला.

00000

संबंधित पोस्ट

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे– मंत्री उदय सामंत

माजी सैनिकांसाठी पदभरती

दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत…

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta