vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

बुलडाणा, प्रतिनिधी : कारागृहात नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांना सणाची उणीव भासू नये, तसेच आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने महिला सदस्यांनी सर्व बंद्यांना व कारागृह कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह सुधारसेवा डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्हा कारागृहात विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक व समुपदेशपर उपक्रम राबविले जातात. रक्षाबंधन सणानिमित्त प्रजापिता ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बुलडाणा यांच्या वतीने कारागृहातील बंद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाई रंजनीकांत व डॉ. लता बाहेकर यांनी बंद्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच उर्मिला दीदी, पुनम दीदी, सुशांत सुरुशे, सुषमा गवई, जयश्री इंगळे, अर्चना बोरले यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कारागृह अधीक्षक मेघा शंकर बाहेकर, उमेश नाईक (तुरुंगाधिकारी), दरेसिंग चव्हाण(सुभेदार), दिनेश डोंगरदिवे, राहुल जाधव, सचिन वाढे, विशाल राजगुरु, नितीन नरोटे व कारागृह शिपाई यांचे सहकार्य लाभले.

00000

संबंधित पोस्ट

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची !मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी व्यसन मुक्तीचा समुपदेशनपर कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावरील भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

मातृभाषेतून शिक्षणामुळे शब्दसंग्रह, ज्ञानसंपदेत वाढ- शाहीर पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

vishwatmaklokswamivarta