vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

चंद्रपूर, प्रतिनिधी: आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. गोंडपिंडरी) येथील ग्रामसभेला भेट दिली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 अंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक व सामूहिक वनहक्कांमुळे ग्रामस्थांच्या जीवनमानात झालेल्या बदलांचा आढावा घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

विशेष म्हणजे वाघमारे हे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी असताना पाचगाव ग्रामसभेला पहिला सामूहिक वनहक्क दावा 16 जून 2012 रोजी त्यांच्या हस्ते मंजूर करण्यात आला होता. तब्बल 13 वर्षांनंतर आदिवासी विकास विभागाचे सचिव या नात्याने त्यांनी पुन्हा ग्रामसभेला भेट दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.प्रसंगी ग्रामसभेच्या वतीने सचिव वाघमारे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बैठकीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सामूहिक वनहक्कांमुळे उपजीविका, जंगल व्यवस्थापन व जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी ग्रामस्थांनी अनुभव कथन केले. या कार्याबाबत समाधान व्यक्त करत भविष्यातील अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन सचिवांनी दिले.

दौऱ्यादरम्यान गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाचगाव येथील भेटीनंतर सचिव वाघमारे यांनी पाटण (ता. जीवती) येथील शासकीय आश्रमशाळेस भेट दिली. शाळेच्या एकूण व्यवस्थेची पाहणी करत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे कौतुक करून शालेय प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या. शाळेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक व सर्वांगीण विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.

 

०००

संबंधित पोस्ट

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना-ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला कंटेनर ची जोरदार धडक दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta