vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी (दि.24 जानेवारी) रोजी कर्जत येथील उपविभागीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड, तहसीलदार धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्धता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी स्ट्राँग रूम व निवडणूक साहित्य कक्षाचीही तपासणी केली. तसेच स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती राबवून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

०००००

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक 2026.

vishwatmaklokswamivarta

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta