vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

*घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा*

 मुंबई प्रतिनिधी – महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव उद्या दिनांक 1 मे रोजी बुद्धपौर्णिमेला

घाटकोपर पश्चिम भीमनगर येथील जयभवानी विकास मंडळ येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे.भीमनगर मधील जय भवानी विकास मंडळाच्या धम्मत्न बुद्धविहाराचे आमदार राम कदम यांच्या प्रयत्नातून नूतनीकरण करण्यात आले असून या बुद्धविहार नवीन बुद्धमूर्ती स्थापना यावेळी पूजू भिक्खू संघ आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.ही बुद्धमूर्ती येथील घोडेस्वार परिवाराच्या वतीने बुद्धविहाराला धम्मदान म्हणून देण्यात आली असून दिवंगत शंकर रणपिसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा धम्मत्न बुद्धविहाराला धम्मदान म्हणून देण्यात आला आहे अशी माहिती जय भवानी विकास मंडळाच्या वतीने समाजसेवक

डॉ.निलेश बनसोडे यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे संयोजन जय भवानी विकास मंडळाचे अध्यक्ष मयुर चाबुकस्वार; सचिव उमेश गायकवाड आणि खजिनदार हितेश जगताप सह सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

घाटकोपर पश्चिम भीम नगर येथील बुद्धविहार क्रमांक 1 असणारे धम्मरत्न बुद्धविहार येथे जय भवानी विकास मंडळाच्या वतीने आयोजित बुद्धपौर्णिमा महोत्सव आणि बुद्धमूर्ती स्थापना सोहळ्यात सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी बुद्धपौर्णिमेनिमित्त अन्नदान सहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास आमदार राम कदम; महापौर रितू तावडे; माजी आमदार वीरेंद्र बक्षी ; नगरसेविका सई शिर्के; बाळासाहेब गरुड ; हेमंत रणपिसे; रिपब्लिकन पक्षाचे मायनॉरिटी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख; प्रवीण सिंह; मनसे चे गणेश चुक्कल शिवसेना घाटकोपर चे इम्रान शेख; आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जय भवानी विकास मंडळाच्या वतीने डॉ नीलेश बनसोडे यांनी दिली आहे.

000

संबंधित पोस्ट

माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर.! नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मा.संतोष बोराटे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तिपत्र

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील- उद्योग मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण,एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार