vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कॉकरोच जनता पार्टी’ नव्हे ‘कम्युनिस्ट जनता पार्टी’ *गोव्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनात ‘हिंदुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा; ‘सीजेपी’चा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा उघड !आंदोलकांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी*

‘कॉकरोच जनता पार्टी’ नव्हे ‘कम्युनिस्ट जनता पार्टी’ *गोव्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनात ‘हिंदुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा; ‘सीजेपी’चा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा उघड !आंदोलकांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी*

राज्य प्रतिनिधी-‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या वतीने पणजी येथे नुकतेच आंदोलन करण्यात आले. वरकरणी हे आंदोलन ‘एस्‌.आय.आर्‌.’चा विरोध आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा या मागण्यांसाठी केले असले, तरी प्रत्यक्षात तिथे उघडपणे ‘हिंदुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. यातून ‘सीजेपी’चा आंदोलनामागील ‘हिंदुविरोधी अजेंडा’ पुन्हा एकदा समोर आला. आंदोलनाचा हेतू हिंदूंना लक्ष्य करणे आणि शांत गोव्यातील सामाजिक सलोखा बिघडवणे हाच होता, त्यामुळे ‘सीजेपी’ आंदोलनाच्या सूत्रधार अमरिन शेख यांच्यासह सर्व आंदोलकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केली आहे.

श्री. नाईक यांनी पुढे म्हणाले की, या संघटनेच्या आंदोलनांचा पूर्वेतिहास पाहता त्यांच्या व्यासपीठावरून सातत्याने हिंदूविरोधी आणि देशविरोधी भूमिका मांडली जात आहे. पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची कवितेवर आधारित ‘सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे… बस नाम रहेगा अल्लाह का…’ हे गीत स्वरूपात सादर केले गेले. एकीकडे प्रभू श्रीराम-हिंदुवाद यांचा द्वेष आणि दुसरीकडे पाकिस्तानी कवी-‘नाम रहेगा अल्लाह का’ हा इस्लामिक प्रचार यातून ‘सीजेपी’चा बुरखा फाटला आहे. गोव्यातच यापूर्वी ‘नीट परीक्षां’च्या विरोधात आमरिन शेख यांच्याच नेतृत्वात झालेल्या आंदोलनात ‘फ्री उमर खालिद’चे पोस्टर्स झळकावले गेले.

 यांसारखे अनेक ठिकाणी ‘सीजेपी’च्या आंदोलनात हिंदुविरोध आणि देशद्रोह्यांचे समर्थन करण्यात आले आहे. तरी अशा आंदोलनांमुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जात आहे. सामाजिक विषयांचे निमित्त करून देशातील युवकांना हाताशी धरून अराजकता माजवण्याचे काम ‘सीजेपी’ करत आहे. ‘सीजेपी’ ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ नसून ‘कम्युनिस्ट जनता पार्टी’ आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. तरी या संघटनेला देशद्रोही आणि हिंदुद्रोही घोषित करून त्यांच्यावर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.*श्री. रमेश शिंदे* , राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समितीसंपर्क क्रमांक : ९९८७९६६६६६)

संबंधित पोस्ट

कट प्रॅक्टिस खपवून घेतली जाणार नाही; शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतशेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात मिरजेतील P1-P2 पार्किंग अधिसूचना शिथिल

vishwatmaklokswamivarta

समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवा; बचाव यंत्रणा सक्षम करा- पालकमंत्री भरत गोगावले,धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावा; बीचवर जीवरक्षक, प्रशिक्षित आपदा मित्र आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करा

vishwatmaklokswamivarta

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षणजिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग