vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गणेशोत्सव काळात मिरजेतील P1-P2 पार्किंग अधिसूचना शिथिल

गणेशोत्सव काळात मिरजेतील P1-P2 पार्किंग अधिसूचना शिथिल

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील गर्दी आणि वाहतुकीचा विचार करून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी या मार्गावरील P1-P2 पार्किंगबाबतची अधिसूचना शिथिल केली आहे.

     मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी या मार्गावर ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांवर गणेशमूर्ती बसवून विद्युत रोषणाई करण्यात येते. या मार्गावरून गणेशोत्सवानिमित्त मिरवणुका काढण्यात येतात. तसेच, या मार्गावर शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने गणेशोत्सवाच्या कालावधीत मिरज शहरासह आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक व भाविक खरेदी तसेच गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी येत असतात.

      मिरज शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग असलेल्या महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी या मार्गावर दि. ४ जून २०१८ रोजीच्या आदेशान्वये P1-P2 पार्किंगबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. गणेशोत्सव काळातील मिरज येथील गर्दी व बाजारपेठ याचा विचार करता P1-P2 पार्किंग बाबतची अधिसुचना 14 ते 25 सप्टेंबर 2026 कालावधीसाठी शिथिल करण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

जरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’च्या माध्यमातून लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप.

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी