vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना (प्रतिनिधी) ः सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचे कौतुक होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील हिरकणी ग्रुप आणि उज्वल बहुउद्देशील सेवाभावी संस्थेच्या वतीने हिरकणी पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी देखील या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍या पात्र महिलांनी हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सौ. करुणाताई मोरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांनी आहे

महिलांनी केलेल्या कर्तबगारीचे कौतुक व्हावे आणि त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी दर वर्षी हिरकणी पुरस्कारासाठी कर्तबगार महिलांची निवड केली जाते. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या आणि समाजासाठी भरीव योगदान देणार्‍या महिला या पुरस्कारातही अर्ज करू शकतात. या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी फी नाही. किंवा या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. केलेल्या कामाचा प्रस्ताव परिपूर्ण पाठवावा. अर्जानुसार केलेल्या कामाचे मुल्याकंन करून पुरस्कार निवड समिती पात्र महिलेची पुरस्कारासाठी निवड करेल. निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. राज्यातील किंवा राज्य बाहेरील कोणत्याही महिलेला या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. या पुरस्कारासाठी भाषा, जात, प्रांत असा कोणताही भेद नाही. सर्व समाजातील, सर्व भाषेच्या तसेच सर्व प्रांताच्या महिला या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील. पुरस्काराचे अर्ज हे ऑनलाई पध्दतीने https://forms.gle/cRK8DHvm3LSEhdm99 या लिंकवर फॉर्म भरुन दि. 10 फेब्रुवारी 2025 पर्यत सादर करता येतील. सादर करता येतील. निवड झालेल्या महिलांना कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ कळविण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन सौ. करुणाताई मोरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांनी केलं आहे.

संबंधित पोस्ट

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’