vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.

 येथील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थायेथे हे प्रशिक्षण पार पडले. दि. आसरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. दि. आसरा फाउंडेशनचे स्नेहा नन्नावरे, प्रकाश आगाशे, उद्योजक शिवप्रसाद जाजू, डॉ. आनंद गोडसे, आशीष गर्दे यांनी मार्गदर्शन केले. विशेष कार्य अधिकारी कृष्णा कांगुले हे यावेळी उपस्थित होते.याठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, माविम, अपंग व वित्त विकास महामंडळ इ. महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सहायक आयुक्त. सुरेश वराडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बहुरे, योगेश उगले, शालिक चौधर, विरेंद्र चव्हाण, गजानन खोकड, रामदास फुले, नागेश मिटकरी, प्रीतम सोनवणे, आदित्य चोपडे आदींनी परिश्रम घेतले.

०००००

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर तालुक्यातील प्रमाणभूत क्षेत्राची अनुसूची प्रसिध्द- तहसीलदार तेजस्विनी पाटील

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

vishwatmaklokswamivarta

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ…

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta