vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी सुट्चे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 विधानपरिषद सदस्य आ. संजय केणेकर तसेच अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, श्रीमती प्रिया पुजारी, माजी महापौर नंदकुमार घोडेले तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिला अनावरण करुन या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, सुभेदारी या विश्रामगृहाला ऐतिहासिक वारसा आहे. येथे अनेक मान्यवर वास्तव्यास राहून गेले आहेत. या शहराचाही लौकीक आहे. या लौकीकाला साजेशी ही वास्तू तयार झाली आहे, याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

 प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्रीमती पुजारी यांनी माहिती दिली की, या इमारतीत बेसमेंट मजल्यावर वाहनतळ, वाहनचालकांसाठी कक्ष, इलेक्ट्रीक रुम, तळ मजल्यावर दोन व्हीव्हिआयपी सुट, स्वयंपाक व भोजन कक्ष, पुरुष महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृहे, पहिल्या मजल्यावर एक व्हीव्हीआयपी कक्ष, कॉन्फरन्स हॉल, प्री फंक्शन लॉबी, सार्वजनिक स्वच्छता गृहे, दुसरा मजल्यावर एक मुख्यमंत्र्यांचा कक्ष, एक व्हीव्हीआयपी कक्ष, टेरेस रुफ गार्डन, या शिवाय प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट, इलेक्ट्रिक रुम आदी सुविधा आहेत. या कामांसाठी एकूण १३ कोटी १८ लक्ष ६३ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता होती. त्यापैकी स्थापत्य कामावर ८ कोटी ५ लक्ष ४ हजार रुपये, अंतर्गत सजावटीकरणावर १ कोटी ७१ लक्ष १ हजार रुपये तर विद्युत कामांवर ३ कोटी ८३ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

संबंधित पोस्ट

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 6 जिल्हयातील 13 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे• बार्बाडोस येथील ६८ व्या सी.पी.ए. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात भारतातील राज्य विधानमंडळ पीठासीन अधिकारी यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta