vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये राज्य शासन आणि स्थानिक संस्थांच्या आर्थिक सहभागाच्या विद्यमान धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी;

 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये राज्य शासन आणि स्थानिक संस्थांच्या आर्थिक सहभागाच्या विद्यमान धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी; तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी संचालनालय नगर प्रशासन (डीएमए) मार्फत समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली

नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य कृपाल तुमाने यांनी याबाबत सूचना मांडली. यावेळी चर्चेत सदस्य मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना सौरऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेला हिस्सा उभारण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करता येईल का किंवा पीपीपी मॉडेल प्रभावीपणे राबवता येईल का, याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश डीएमएला दिले जातील. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल राज्यात सध्या विविध प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात आर्थिक सहभाग निश्चित करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सौरऊर्जा मॉडेलचा उल्लेख करत मंत्री सामंत म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) अपरंपरागत ऊर्जा निधीतून सौरऊर्जा प्रकल्प उभारून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वीजबिलाचा मोठा भार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एक मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण झाला असून गुहागर आणि दापोली येथेही असे प्रकल्प उभारले जात आहेत.

रत्नागिरी नगरपालिका स्वतःचा स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प उभारणारी राज्यातील पहिल्या नगरपालिकांपैकी एक ठरणार आहे. अशा प्रकल्पांमुळे रस्ते दिवे आणि पाणीपुरवठा योजनांवरील वीज खर्चात मोठी बचत होईल. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप ग्रामपंचायतीने अपरंपरागत ऊर्जेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केल्याचे उदाहरणही मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.

00000

संबंधित पोस्ट

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर’ स्थापन करण्यात येणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta