vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

बुलढाणा, द प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात, राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला.या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.

विदर्भातील चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयम यांनी गेल्या 24 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत समर्पित सेवा दिली आहे. विशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागामध्ये कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि आरोग्य जनजागृतीमध्ये घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे. नैसर्गिक आपत्ती प्रवण क्षेत्र असो किंवा कठीण भौगोलिक परिस्थिती, उच्च जोखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सक्षम परिचारिका जीव वाचवतात” अशी ठेवण्यात आली होती. या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे आहे.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…

कृपया प्रसिद्धीसाठी !महाराष्ट्र मंदिर महासंघामुळे कोट्यवधीची मंदिराची जमीन बिल्डर लॉबीच्या घशात जाण्यापासून वाचली सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन अवघ्या९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश अखेर रद्द!* उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आदेश अखेर रद्द !* अमरावतीतील ऐतिहासिक सोमेश्वर महादेव देवस्थानची मालकी अबाधित !

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन