vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*

*प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: “लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जात आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) श्री. विकास खारगे यांनी आज येथे केले.

  अलिबाग तालुक्यातील सारळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित भव्य ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

*राज्यव्यापी मोहिमेतून प्रशासनाचा कायापालट..*   यावेळी मार्गदर्शन करताना श्री. खारगे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात (सर्कल) राबविला जात आहे. दर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील सहा मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या शिबिरांचे नियोजन केले जाईल, जेणेकरून एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही.

  कार्यक्रमात बोलताना श्री. शिवाजी चौरे यांनी नमूद केले की, ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी हातात हात घालून काम करतात, तिथे विकासकामांचा वेग अधिक असतो. या अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे

    *महसूल विभाग: सर्व विभागांचा दुवा – जिल्हाधिकारी किशन जावळे*

    जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “महसूल विभाग हा केवळ एक विभाग नसून तो सर्व शासकीय विभागांना एकत्र बांधणारा समन्वय साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे विविध दाखले, परवाने आणि शासकीय योजनांचा लाभ अत्यंत सुलभपणे आणि विनाविलंब मिळावा, हाच या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे.”

 *शिबिरातील प्रमुख आकर्षणे व सेवा…*     दाखल्यांचे थेट वाटप: जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले यांचे जागीच वाटप.   योजनांची माहिती: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन आणि अर्ज स्वीकारणे.     प्रलंबित प्रकरणांचा निपटारा: नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष.    या सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी श्रीमती शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सारळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उदंड प्रतिसाद दिला असून, प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

000000

संबंधित पोस्ट

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..

जेष्ठ नागरिक चर्मकार बांधवांचा स्टॉल मूळ जागेपासून हलवल्यामुळे समाजात तीव्र नाराजी संताप..

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे..