vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

   राज्य प्रतिनिधी – कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीर नगरीत १० मे २०२६ या दिवशी भव्य अशा हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, ‘भागिरथी महिला मंच’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, भाजप, शिवसेना, पतित पावन संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, चिन्मय मिशन, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती.

    मिरजकर तिकटी येथे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीत चारचाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देव यांचे छायाचित्र असलेली पालखी होती. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या ग्रंथाचे प्रकाशन !  समारोपप्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. अभय वर्तक, तसेच आरोग्यभारतीच्या वैद्या अश्विनी माळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

* क्षणचित्रे१. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ यांनी सादर केलेल्या चित्तथरारक अशा शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरणाने तेजस्वी शिवकालाचे स्मरण झाले. या वेळी लव्ह जिहादची भयावहता दाखवणारा देखावा सादर करण्यात आला. २ मर्दानी खेळांचे पथक, लेझिम पथक, ‘गदा पथक’, ‘शाहिरी पथक’,बासरी पथक, वानर सेना पथक, ढोलपथक, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक अशा ५० प्रकारच्या विविध पथकांचा दिंडीत समावेश होता. यांच्या सहभागाने दिंडीतील वातावरण चैतन्यमय झाले होते.३. नऊवारी साडी परिधान केलेल्या कलशधारी महिला, पारंपारिक वेशात सहभागी झालेले साधक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर दिंडीत सहभागी होते.४. दिंडीतील वारकर्‍यांच्या ‘राम कृष्ण हरि’च्या जयघोषाने कोल्हापूरकरांनी आध्यात्मिक रसाची गोडी अनुभवली.   अभय वर्तक,प्रवक्ते, सनातन संस्था. (संपर्क : ९९८७९२२२२२)

—————————————-

संबंधित पोस्ट

आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta