vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

 

लातूर, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ पर्यंत असून उमेदवारी अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी केली जाईल, तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

यानंतर गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी केली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

****

संबंधित पोस्ट

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश