vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान सुरू होणार

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान सुरू होणार

नवी मुंबई प्रतिनिधी –

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान होत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक टप्प्यावरील कामाचा वेळोवेळी बारकाईने आढावा घेतला आहे.

          आज निवडणूकीच्या आदल्या दिवशी 14 जानेवारी रोजी आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकांकडे निवडणूक साहित्य वितरण व्यवस्थित रितीने झाले असून सर्व पथके आपापल्या मतदान केंद्रावर पोहचली आहेत.

           15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होणार असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.  निवडणूक विषयक महत्वाचे

• मतदार संख्या – 9,48,460  पुरुष – 5,16,267  महिला – 4,32,040  इतर – 153• एकूण 28 प्रभाग  त्यामधील 1 ते 27 क्रमांकाचे प्रभाग 4 सदस्यीय आणि 28 क्रमांकाचा प्रभाग 3 सदस्यीय

• 28 प्रभागांमध्ये 500 उमेदवार निवडणूकीसाठी उभे आहेत. • मतदान केंद्र ठिकाणे – 191• एकूण मतदान केंद्रे – 1148• तात्पुरत्या मंडपातील मतदान केंद्रे – 180• मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता. यामध्ये – बैठक व्यवस्था, पिण्याची पाणी व्यवस्था, प्रसाधनगृहे व्यवस्था, वैद्यकिय पथक, इमर्जन्सी मेडिसीन किट इ.

 व्हिलचेअर व्यवस्था – 345

मेडिकल किट – 200• प्रत्येक केंद्राच्या बाहेर वोटर अस्टिन्टन्ट बूथ लावले असून तेथे संबंधित बीएलओ हे मतदारांना सहाय्य करणार आहेत•

मतदान केंद्रांवर मतदारांना सहाय्यासाठी 250 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत.• दिव्यांग, वयोवृध्द नागरिक, गरोदर महिला यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार.• तान्हे बाळ व लहान मुलांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांच्या ठिकाणी आशा स्वयंसेविका यआंची नियुक्ती केली असून तेथे मतदान करेपर्यंत लहान मुलांची काळजी घेण्यात येईल.• मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास मनाई. चुकून सोबत आणला असल्यास तो बाहेर ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल लॉकर पाऊच व्यवस्था.

• कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग मतदान केंद्रे व परिसर 1250 सीसीटिव्हीव्दारे सुरक्षित. त्यावर महानगरपालिका मुख्यालय, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस आयुक्तालय येथून थेट देखरेख ठेवली जाणार आहे. • मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता 1 मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी व शिपाई अशा एकूण 6890 कर्मचाऱ्यांची नेमणूक. त्यामध्ये 10 टक्के पथके राखीव ठेवण्यात आलेली आहेत.

त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झालेली आहेत.याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही सज्ज असणार आहे. मतदान प्रक्रियेत 1579 कंट्रोल युनिट व 3159 अधिक बॅलेट युनिट प्राप्त. सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तर व व्दितीय स्तर तपासणी तसेच सिलींग प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समक्ष करण्यात आलेली आहे.• प्रत्येक विभागामध्ये एक याप्रमाणे प्रत्येकी आठ महिला स्पेशल – सखी मतदान केंद्र (पिंक बूथ) तसेच पर्यावरणशील आदर्श मतदान केंद्र (ग्रीन बूथ) स्थापित करण्यात येत आहेत.• निवडणूकीच्या कामकाजाकरिता 192 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना नेमून दिलेल्या भागातील मतदान केंद्रांवरील कामकाजावर त्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे व ते त्याठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या सहकारी समूहाच्या सहयोगाने दक्ष राहणार आहेत.* कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस विशेष शाखा यांचेमार्फत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.यामध्ये – 2 पोलीस उपआयुक्त, 8 सहा. पोलीस आयुक्त, 28 पोलीस निरीक्षक तसेच 241 पीएसआय. 2123 पोलीस पुरूष – महिला कर्मचारी, 1186 होमगार्ड त्याचप्रमाणे एसआरपीएफच्या 7 प्लॅटून यांची बारीक नजर असणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 10 वा. पासून आठ विभागांची मतमोजणी आठ ठिकाणी करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे व त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.• 14 जानेवारी रोजी मतदान साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर गेल्यानंतर तेथे मतदानासाठी साहित्य मांडणी करुन झाल्यानंतर निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता रात्री राहण्यासाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. रात्र निवा-याच्या ठिकाणी फॉगींग करण्यात येत आहे.• आचारसंहिता नियंत्रणासाठी 24 तास – 9 SST पथके, 8 FST पथके आणि 16 VST पथके कार्यान्वित. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर 200 मीटर सीमा चिन्हांकित केल्या असून तेथून पुढे वाहने नेता येणार नाहीत.• दिव्यांग व वयोवृध्द मतदारांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केलेली आहे. त्याबाबतच्या मदतीकरिता खालीलप्रमाणे विभागानुसार मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा

बेलापूर – 9004357721नेरुळ – 9004347995,वाशी – 8169484236 तुर्भे – 9892746228 कोपरखैरणे – 9768068749 घणसोली – 9004796650 ऐरोली – 9967108740 दिघा – 8108246729

नमुंमपा मुख्यालय बेलापूर 022-27567412• मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपली ओळख पटविण्यासाठी मतदाराने आपला फोटो असलेले ‘मतदार ओळखपत्र’ (EPIC – Electors Photo Identity Card) सादर करावे असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सूचित केले आहे. जे मतदार छायाचित्रासह असलेले आपले मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त खालील 12 पुराव्यांपैकी कोणताही पुरावा सादर करणे आवश्यक आहे.या 12 पुराव्यांमध्ये – (1) भारताचा पासपोर्ट,  (2) आधार ओळखपत्र – आधार कार्ड,  (3) वाहन चालविण्याचा परवाना,   (4) आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र – पॅन कार्ड,  (5) केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या     कर्मचा-यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे,  (6) राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक,   (7) सक्षम प्राधिका-याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला,  (8) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र MNREGA जॉब कार्ड),    (9) निवृत्त कर्मचा-यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्ती यांचा फोटो असलेली निवृत्ती वेतन        विषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.),  (10) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या  सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र,   (11) स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र,(12) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड – अशा 12 पुराव्यांचा समावेश आहे.• मतदान व मतमोजणीची माहिती प्रसार माध्यमांना विहित वेळेत देण्यासाठी महापालिका मुख्यालयात प्रसारमाध्यम कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आठही मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत पत्रकार कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.     नवी मुंबई महानगरपालिकेने मतदान व मतमोजणीकरिता आवश्यक ती संपूर्ण तयारी केली असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने घटनेने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावावा व संविधानाचा सन्मान करावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे

000000

 

संबंधित पोस्ट

राज्यातील 5 शहरांना शहर स्वच्छतेसाठी मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईची प्रभावी कामगिरी-‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम..

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी….

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली..

vishwatmaklokswamivarta

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!