vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत नागरिकांना आवाहन

औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत नागरिकांना आवाहन

जालना, प्रतिनिधी : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने दि. २० मे, २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. या संपामध्ये संघटनेचे सभासदांनी सहभागी होवू नये याबाबत त्यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. तथापि, नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करून ठेवावा. संपाच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (औषधे) श्री. जी. डी. जाधव (83790 16068) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जी.डी. जाधव सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधा प्रशासन यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा !- महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी…

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.