vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

     अमरावती, प्रतिनिधी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे सोमवार, दि. 25 मे रोजी सकाळी 10 वाजता भव्य शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा संस्थेच्या एनएसएस हॉलमध्ये पार पडणार आहे.

   अमरावती जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण, तसेच सध्या अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे. यात फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक व्हेइकल, वायरमन, इलेक्ट्रीशियन, आरएसी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतील

    या भरती प्रक्रियेसाठी नागपूर आणि पुणे येथील कंपन्या उपस्थित राहणार आहे. उमेदवारांनी मेळाव्याला येताना आपला अद्ययावत बायोडाटा आणि सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण आणि अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थ्यांनी याच लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार नवी ऊर्जा

नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील अनेकांनी भिकन रोजेकर यांचा आदर्श घ्यावा: आमदार नारायण कुचे

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta