vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू,

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज…

                                                                                                                                                                                                                                                                                  #नांदेड , प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा #निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.                                                                                                                                       निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                                                                                                 निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ असून, अर्जांची छाननी २ जून रोजी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या मतदारसंघात एकूण १७ कार्यरत स्थानिक प्राधिकारी संस्था असून, मतदारांची संख्या ४३२ इतकी आहे. अंतिम यादीपर्यंत या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या 8 राहणार असून, नांदेड जिल्ह्यातील सर्व उप विभागाच्या मुख्यालयी तहसिल कार्यालयात प्रत्येकी एक मतदान केंद्र राहणार आहे.

         यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांनी नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक, मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम २०२६ बाबत सविस्तर माहिती दिली. मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि पडताळणी प्रक्रियेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी                                                                                                                                 दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधितांना केले. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता राजकीय पक्ष, स्थानिक संस्था आणि प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

संबंधित पोस्ट

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं; भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते… 💥🔥

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये*

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अभियंता पदी श्री विनायक कृष्णा भट व सहाय्यक कामगार अधिकारी पदी श्रीमती इंगळे  यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta