vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी किशन जावळे*

*शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी किशन जावळे*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेला दिल्या.

     जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता,सा.बां.विद्युत विभाग पेण, प्र.अ.दोडे, कार्यकारी अभियंता,विद्युत सा.बां.विभाग, अलिबाग पुजा जाधव, उप कार्यकारी अभियंता, बांधकाम जि.प.सचिन बैकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रत्नाकर काळे आदि प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील शासकीय विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

       उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली आहे.

     मुख्यत्वे आरोग्य, पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहे. या समित्यांनी आपल्या नेमून दिलेल्या कामांचे योग्य ते सूक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीरित्या कशाप्रकारे संपन्न होईल ते पाहावे.

    कार्यक्रमाकरिता येणाऱ्या शिवभक्तांसोबत सलोखा ठेवावा. तसेच खर्च करताना काळजीपूर्वक खर्च करुन काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करावा,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

     आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषत: सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. या सोहळ्यादरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये, या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचित केले. तसेच पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे आणि आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत, असेही त्यांनी सांगितले.

०००००००

संबंधित पोस्ट

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

vishwatmaklokswamivarta

दुर्घटनेला जबाबदार कोण? नागरिकांचा संताप — आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारीच जबाबदार?मध्य रेल्वे मार्गावर सँन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताने सर्वत्र संतापाची लाट ..

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

vishwatmaklokswamivarta

कल्याण प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरुणाने मारहाण करण्याआधी रिसेप्शनिस्टनेच -आरोपीच्या वहिनीला थोबाडीत मारली असल्याचे समोर आले…