vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्याभरात प्रत्येक कार्यालयात लोकसेवकांचे व नागरिकांचे प्रबोधन करावे, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लोकसेवकांनी लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

   दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, संगिता राठोड, संगिता सानप तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    दक्षता जनजागृती सप्ताह सध्या राबविण्यात येत आहे. यानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात ॲन्टीकरप्शन ब्युरोच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले की, एखाद्या लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे.त्यासाठी त्यांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ७७२०८९१०६४ या व्हॉट्सअप क्रमांकावरही संपर्क साधू शकता.

     जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची माहिती द्यावी. आपल्या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनाही ही माहिती द्यावी. त्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहानिमित्त करावे,असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसिल कार्यालये, गटविकास अधिकारी आदी दुरदृष्यप्रणालीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

०००००

संबंधित पोस्ट

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

जालना ड्रायपोर्टच्या उभारणीस गती देण्यासाठी खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta