vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.

जालना प्रतिनिधी आज जागतिक योग दिनानिमित्त पार्थ सैनिकी शाळा, खरपुडी (जालना) येथे योग कार्यक्रम उत्साहात पार पडला. “माय भारत, जालना”, पार्थ सैनिकी शाळा आणि युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा. मोहन नेहरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रशुद्ध महत्त्व उलगडून सांगितले. ते म्हणाले, “मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे समतोल शारीरिक आरोग्य प्रदान करणे हे योगाचे मुख्य उद्दिष्ट आहे.” त्यांनी योगाभ्यास केवळ शरीराच्या लवचिकतेसाठी नसून, तो संपूर्ण जीवनशैलीसाठी महत्त्वाचा असल्याचे उदाहरणासहित समजावले.

कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षक सुशील कुमार काकडे, सत्येंद्र सिंग बिस्ट व भगवान पडवळ यांनी विविध प्रकारचे योगासन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दिले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत योगशिक्षणाचे अनुकरण केले. सुर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती, ताडासन, वज्रासन इत्यादी योगासनांची सविस्तर माहिती देत, त्याचे आरोग्यावर होणारे फायदे समजावले गेले.

विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जाणिवा निर्माण करणे, त्यांना नियमित योगासाठी प्रेरित करणे आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेस बळ देणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन योगेश बावस्कर व भैय्यासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. विशेषतः युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. जयपाल राठोड यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले. त्यांनी संस्थेच्या वतीने योग दिनासारख्या कार्यक्रमांद्वारे युवकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवले जातील, असे आश्वासन दिले.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी गोडी निर्माण झाली असून, भविष्यात दररोजच्या जीवनशैलीत योगाचा समावेश होण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन शिक्षकांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

जिल्हा ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन, वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा..

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळा

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू