vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात “धरती आभा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बँकांमार्फत वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन

ठाणे जिल्ह्यात “धरती आभा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बँकांमार्फत वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- ठाणे जिल्हा प्रशासनाच्या “धरती आभा” अभियानांतर्गत आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी वित्तीय साक्षरता शिबिरे आयोजित करण्यात आली. ही शिबिरे राहूर, मेंडे, मोहप, दहिवली, नेवाडे इत्यादी विविध ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पार पडली. ३० जून पर्यंत विविध ग्रामपंचायतीमध्ये ही शिबिरे घेतली जातील.

  या शिबिरांमध्ये आदिवासी समाजातील नागरिकांना बँकिंग सेवा, बचत खात्याचे महत्त्व, डिजिटल व्यवहार, तसेच सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः खालील उपक्रम राबविण्यात आले…..• नव्याने बचत खाती उघडली गेली(प्रधानमंत्री जनधन योजनेत)• प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये नोंदणी• प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) मध्ये नोंदणी  बँकांचे प्रतिनिधी आणि आर्थिक साक्षरता सल्लागार यांच्या सहभागातून जागेवरच बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांनी थेट लाभ घेतला.  या शिबिरांना आदिवासी महिलांचा, युवकांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बँकिंग क्षेत्रावरील विश्वास वाढण्यास मदत झाली. गावातील विविध योजनांविषयीची माहिती व शंका निरसन यासाठीही ही शिबिरे प्रभावी ठरली.  “धरती आभा” अभियानामार्फत ठाणे जिल्हा प्रशासनाचे सर्वसमावेशक आणि तळागाळातील सक्षमीकरणाचे ध्येय जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक आणि त्यांचे कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अधिक बळकट होत आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या –

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

अतिवृष्टीचा इशारा : नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta