vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन· शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून बालकलावंतांचे कौतुक

गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन· शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून बालकलावंतांचे कौतुक

मुंबई, प्रतिनिधी: जवाहर बालभवनमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला, सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांना चालना मिळते. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल तसेच शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘गणेश मूर्ती कृतिसत्र’, ‘वेशभूषा स्पर्धा’ आणि ‘गणेश मूर्ती बनविणे स्पर्धा’ अशा विविध उपक्रमांचे २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती कृतिसत्र आयोजित करण्यात आले असून, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पौराणिक वेशभूषेवर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच विविध कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि भारतीय संस्कृतीबाबतची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन ही संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरत असल्याची माहिती बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी यावेळी दिली.
00000

संबंधित पोस्ट

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा

vishwatmaklokswamivarta

सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम

जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात,नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन