vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष,सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा…

पुणे, प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा (JMFC व CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असलेला वकिलीचा अनुभव (Law Practice) तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी असलेली तीन वर्षांच्या वकिलीच्या अनुभवाची अट बदलून एक वर्ष करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने वर्ष २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ करिता ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी सुधारित पात्रता निकषाची नोंद घेऊन त्यानुसार ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन निलेश सागर (भा.प्र.से.), अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंमलबजावणी व समन्वय समिती तथा आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (आसंप्रसं), पुणे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…

कर्तव्यपथावर महाराष्ट्र संस्कृतीचा जयघोष; ‘गणेशोत्सव’ चित्ररथाने वेधले जगाचे लक्ष ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा ‘अशोक चक्र’ने सन्मान

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*